येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विमा कंपन्यांना इशारा

Foto

मुंबई: शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज (१७ जुलै) विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा १६ व्या दिवशी हा मोर्चा बोलायला लागेल असा धमकीवजा इशारा उद्धव ठाकरेंनी बँकांना आणि विमा कंपन्यांना दिला आहे. तसेच येत्या १५ दिवसात मला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची नावे बँकांच्या दरवाजावर दिसली पाहिजेत असेही उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते.

वांद्रे कुर्ला संकुलातील काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते, मंत्री मोर्चात सहभागी झाले होते.“मुंबईत शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन काय करणार ? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पण ही वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यालय बघून ठेवा या ठिकाणी काही दिवसांनी आपल्याला धडकावे लागणार आहे असे उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सांगितले.” या मोर्चावर टीका करणारे नक्की शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. “सामना या वृत्तपत्रातील आजचा अग्रलेख मुद्दाम वाचा त्यात तुम्हाला हा शेतकऱ्यांचा मोर्चा कशासाठी आहे ते समजेल. मुंबईसाठी शेतकऱ्यांनीही रक्त सांडले आहे. टीका करणाऱ्या लोकांच्या रक्तातच भेसळ असेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.”

राज्यात सध्या कोणचे सरकार हा भाग वेगळा आहे. आमच्यासाठी माणुसकी महत्त्वाची  आहे. आम्ही माणुसकी जपणारी माणसे आहोत. ज्यांनी शिवसेना आणि युतीला मते दिली असतील त्यांच्या प्रत्येक मताला उत्तर देण्यास मी बांधील आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालं आहे. त्यावेळी त्यांनी सरकारने कर्जमाफीचे पैसे सरकारने जर बँकांना दिले तर मग ते पैसे गेले कुठे असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका जाणिवेने शेतकऱ्यांसाठी फसल विमा योजना आणली असेल, तर त्याची जाणीव विमा कंपन्याना का नाही? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.



Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker